आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:कोनड खुर्द सरपंचासह सदस्य बिनविरोध

वरूड बुद्रुक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील कोनड खुर्द येथील ग्रामपंचायतीत सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा ग्रामस्थांनी यंदाही कायम राखली. चंदा अजबराव जावळे या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून शोभाबाई अंकुश पैठने, कुसुम बाजीराव वानखेडे, जया प्रताप वानखेडे, संजय दौलत वानखेडे, शंकर संजय जावळे, अनुराधा प्रवीण जावळे, नंदा सुखदेव जावळे यांची निवड करण्यात आली. यंदाही ही निवडणूक बिनविरोध होण्याचा चंग माजी सरपंच तुळशीदास जावळे, भास्कर जावळे, एकनाथ वानखेडे, दौलत वानखेडे, नामदेव वानखेडे, सिद्धार्थ पैठने, अरुण जाधव, प्रशांत वानखेडे, शिवदास वानखेडे, प्रताप वानखेडे यांनी बांधून घरोघरी हा मुद्दा समजून सांगितला होता.

बातम्या आणखी आहेत...