आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उत्तरेकडील शीत लहरींमुळे पारा @12 अंशांवर

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. एकूणच नोव्हेंबर महिन्यात पारा पाच ते सात अंशाने घसरला असून हे वातावरण महिनाभर असेच राहणार आहे. पुढील महिन्यात याहून अधिक थंडी राहणार आहे.

उद्योगनगरी असलेल्या हॉट सीटी जालन्यातही थंडीचे प्रमाण तुलनेने चांगलेच वाढले आहे. जलप्रकल्प, बागायती परिसराच्या भागात थंडी अधिक राहते. मात्र, उद्योगाच्या शहरातही हे प्रमाण सारखेच आहे. तब्बल १५ ते २१ किमी प्रति तासाचा वेग घेत उत्तरेकडील शीत वारे आपल्याकडे दाखल होत आहे. १ नोव्हेंबरला यंदाच्या मोसमात सर्वात कमी म्हणजेच सर्वात कमी १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. मात्र, शीत, उष्ण आणि बाष्प युक्त वाऱ्याचा संगम होऊन तापमानात चढउतार होताे. त्यानुसार २ तसेच ३ नोव्हेंबर रोजी १४ ते १४.५ दरम्यान तापमान राहिले.

गतवर्षी या दरम्यान १८ ते १९ अंश सेल्सियस तापमान होते. तर १ नोव्हेंबरची स्थिती ही १९ तसेच २० रोजीही पहायला मिळाली. या काळात तापमान किमान ३० आणि कमाल १३ होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज होता. यातही बदल होत एका अंशाने कमाल तापमान घसरले. परिणामी या आठवड्यात सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी, दिवसभर काहीसा उकाडा अन् सायंकाळी ५ वाजेनंतर थंडीला सुरूवात होत आहे. यामुळे गारठा वाढत आहे. तर थंडीपासून बचावासाठी नागरिक गरम कपड्याच्या खरेदी करत आहेत.

पारा घसरताच धुक्याची चादर
तापमान खाली आल्याने वाढती थंडी लक्षात घेता वातावरणात अनेक बदल झाले आहे. पहाटे पहाटे हलक्या धुक्याची चादर पहायला मिळत आहे. तर शेती परिसरातील पानांतील गारव्या बरोबरच दवही दिसुन येत आहे. यामुळे बागायती परिसरात नऊ वाजेपर्यंत थंडी, ओलावा अनुभवायला मिळत आहे.

वाढती थंडी ही पिकांसाठी उपयुक्त
रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू तसेच हरभरा पिकांची लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणात झाली आहे. हरभरा, गहू हे पिक थंडीच्या दिवसातच चांगल्या प्रमाणात वाढते. यामुळे ही थंडी उपयुक्त समजली जाते.

बातम्या आणखी आहेत...