आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जाफराबादच्या प्रशालेत गुणवंतांचा सत्कार; सोफियान, लक्ष्मी, शुभम दुधाटकर, श्वेता वाकडेची बाजी

जाफराबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद प्रशाला येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक गुण संपादन केले आहे.

जिल्हा परिषद प्रशाला ये प्रशालेतून प्रथम आलेला सोफियान नाजिम शेख ९७.००, द्वितीय क्रमांक लक्ष्मी समाधान चव्हाण ९४.२० शुभम भाऊसाहेब दुधाटकर ९४.२० तर तृतीय क्रमांक श्वेता संदीप वाकडे ९३.०० हे विद्यार्थी ठरले. तर त्यामध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांध्ये श्वेता विनोद चांदोडकर या मुलीने गणित या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण घेवून विशेष प्राविण्य मिळविले. शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी ९० टक्के वरती उतीर्ण झाले आहे. तर यावेळी शाळेचा दहावीचा निकाल ९८.२७ टक्के लागला आहे. यावेळी दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विशाल वाकडे यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

या प्रसंगी मुख्याध्यापक शिवहरी ढाकणे, रमेश इंगळे, दिलीप आढावे, प्रतिभा गवई, शिवाजी देशमुख, उमेश दूनगहू, मनोज साळवे, बळीराम उबरहंडे, रंजना सांगळे, सुखदा काळे, उषा चव्हाण, मधुकर उखर्डे, विजय वानेरे, अर्जुन धारे, श्रीकांत पवार, ओम देशमुख, वैशाली राऊत, पालक संदीप वाकडे, नाजिम शेख, विनोद चांदोडकर आदी पालक वर्ग उपस्थित होते. ग्रामीण भागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी अधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. ही बाब गुणवत्ता वाढीचे उदाहरण ठरत आहे. शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे पालकांनी यावेळी सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...