आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शास्त्री विद्यालयात करण्यात आला दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आष्टी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात शालान्त प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवारी करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एल. के. बिरादार तर कालीदास जगताप, वसंत धोंडगे, संध्या ठोसर, प्रमोद चौंडे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी दहावी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या श्रावणी चौंडे, सौरव सुरासे, आदित्य गायकवाड, पवन वादे, सानिका गर्भे, विद्या सरोदे आदी विद्यार्थ्यांना पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. सुत्रसंचालन मोहन सोळंके यांनी तर आर. एस. सोनवळकर यांनी आभार मानले. या वेळी रामराव पवार,श्री.मोरे, बी. एस. नागरे राजेंद काळे, प्रकाश अटोळे आदी शिक्षकांची उपस्थिती होती. आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...