आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक

भोकरदन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन शहरातील देशमुख गल्लीतील श्री. छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सर्व प्रथम पाण्याने स्वच्छ त्यानंतर दुधाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते अभिषेक व पुष्पवृष्टी करून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, मंडळाचे अध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष गौरव देशमुख, संतोष अन्नदाते, नारायण जिवरग, रमेश जाधव, प्रल्हादराव देशमुख, विकास जाधव, विलास मुळे, समीर जाधव, दिनेश पडोळ, सुनील देशमुख (गुडू), न.प. चे पंजाब देशमुख, प्रकाश देशमुख यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. श्री छ. शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक व चालू घडामोडी वर मार्गदर्शनपर उपक्रम राबवले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...