आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक शुल्क:बीटेकसाठी किमान 79,600 रुपये, तर कमाल 1,89,800 रुपये वार्षिक शुल्क

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी महाविद्यालयाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वारेमाप शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता प्रवेश व शुल्क नियंत्रण समिती (एएफआरसी) पुढील वर्षीपासून शुल्क ठरवून देणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्देशांची अंमलबजावणी करणार आहे. यात किमान व कमाल शुल्काचे मापदंड निश्चित केले जातील. त्यानुसार बीटेकचे किमान शुल्क ७९,६०० रुपये, तर कमाल १,८९,८०० रुपये असेल. प्रामुख्याने ह्युमन रिसोर्स, लर्निंग रिसोर्स, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन व मिसलेनियस कॉस्ट पाहून शुल्क ठरवले जाईल.

संबंधित महाविद्यालयाच्या मागील तीन वर्षांतील खर्चाचा हिशेबही तपासला जाईल. दरम्यान, एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीच्या शिफारशीनुसार ही शुल्कनिश्चिती होणार आहे. ‘एआयसीटीई’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, एखाद्या कॉलेजसाठी किमान व कमाल शुल्क निश्चित करताना त्याचे कारणही स्पष्ट केले जाईल. कमाल शुल्कापेक्षाही जास्त फीस घेण्यासाठी सशर्त मुभा दिली जाईल. ज्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे संबंधित कोर्सचे ‘एनबीए’ मानांकन (अॅक्रिडिटेशन) असणे आवश्यक आहे.

प्राध्यापकांच्या नियुक्तीचेही नियम : एखाद्या कॉलेजमध्ये चार वर्षांच्या बीटेक कोर्ससाठी ३०० जागा आहेत. म्हणजे चार वर्षांत तिथे १२०० विद्यार्थी शिकतील. तेथे २० विद्यार्थ्यांमागे एक या नियमानुसार या कॉलेजमध्ये किमान ६० शिक्षक असणे आवश्यक. यात ४० असिस्टंट प्रोफेसर, १३ असोसिएट प्रोफेसर व ७ प्रोफेसर असावेत. किमान फी निर्धारणासाठी १०% सहायक, २०% कंत्राटी प्राध्यापक नेमता येऊ शकतात. पण कमाल शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांना सर्व ६० शिक्षक हे पूर्णवेळ घेणे सक्तीचे आहे.

इतर खर्चांसाठी मापदंड : इतर खर्चासाठी विद्यार्थ्यांकडून ६ गोष्टींच्या नावाखाली कॉलेजला शुल्क घेता येईल. यात विद्यार्थ्यांसाठी अॅक्टिव्हिटी (सोशल, जिम, क्रीडा) २०० रुपये, ओळखपत्र ७५ रुपये, रिक्रूटमेंट चार्ज १०० रुपये, लॅबोरेटरी ३५०, पायाभूत सुविधा दुरुस्ती व व्यवस्थापन ३१०० रुपये शुल्क राहिल.

बातम्या आणखी आहेत...