आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपतिपद उमेदवार:मंत्री दानवे यांनी घेतली धनखड यांची भेट ; शेतीसह विविध विषयांवर केली चर्चा

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह भेट घेतली. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे उपस्थित होते.जगदीप धनखर हे मुळात शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेती, पीक, पाणी याविषयी चर्चा केली. आपण शेतीच्या शाश्वत विकासासाठी चांगले काय करू शकतो याबाबत देशभरात उपाययोजना चालू आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे उपयोग करून घेऊ, असे सांगितले. या वेळी मंत्री दानवे यांनी सर्व शेतकऱ्यांची ओळख धनखर यांच्याशी करून दिली. या वेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...