आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा धिक्कार:मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात आक्रोश आंदोलन

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि युवा नेते राहुल गांधी यांना इडीने नोटीस पाठवल्यानंतर संतप्त झालेले काँग्रेस नेते तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व कार्यकर्त्यांनी सोमवारी नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन केल्याने डॉ. राऊत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष शेषराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करत केंद्र सरकारचा धिक्कार करणार आला.

आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष जाधव, राजेश कांबळे, प्रदीप चोरमारे, शेख हकीम, महेंद्र शिरगुळे, संतोष वाघमारे, शेख अन्सार, प्रभू दाभाडे, संजय कांबळे, अशोक थोरात, कृष्णा घोगरे, सचिन तांबे, अनंता हिवाळे, विठ्ठल बनसोडे, परमेश्वर पवार आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...