आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी‎:वडीगोद्रीत पीक नुकसानाची‎ मंत्री सत्तार यांनी केली पाहणी‎

वडीगोद्री‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन‎ नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून‎ अहवाल सादर करण्याचे आदेश‎ राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी‎ जिल्हा प्रशासनास दिले. अंबड‎ तालुक्यातील वडीगोद्री येथे अवकाळी‎ पावसाने झालेल्या नुकसान पाहणी‎ दौऱ्यासाठी आले होते.‎ अंबड तालुक्यातील वडीगोद्री‎ परिसरात १६ मार्च रोजी रात्री वादळी‎ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व‎ गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे‎ नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील‎ काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी‎ आदी पिकांसह मोसंबी बागेतील फळांची‎ मोठी फळगळ होऊन शेतकऱ्यांचे‎ नुकसान झाले आहे.

या नुकसानग्रस्त‎ पिकांची पाहणी करण्यासाठी शनिवारी‎ कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे बीड येथून‎ भोकरदनकडे जात असताना वडीगोद्री‎ परिसरातील नुकसानग्रस्त पिकांची‎ पाहणी केली.‎ यावेळी अंतरवाली सराटी शिवारात‎ संजय तांदळे यांच्या शेतातील वादळी‎ वाऱ्यासह गारपिटीने आडवा झालेल्या‎ गहू पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी‎ केली. या पाहणी दरम्यान जिल्ह्यात‎ अवकाळी पावसाने झालेल्या‎ नुकसानीचे पंचनामे करून अहवाल‎ सादर करण्याच्या सूचना जिल्हा‎ अधिक्षक कृषी अधिकारी भिमराव‎ रणदिवे यांना दिल्या. यावेळी स्वाभिमानी‎ शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश‎ काळे, तालुका कृषी अधिकारी सचिन‎ गिरी, नायब तहसीलदार धनश्री‎ भालचिम, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे‎ मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे,‎ बप्पासाहेब काळे, उमेश बर्वे, सेवानिवृत्त‎ मंडळ कृषी अधिकारी हनुमंत काळे,‎ कैलास माने, ऋषिकेश लिपणे, पवन‎ पवार, रविंद्र घाडगे यांच्यासह‎ परिसरातील शेतकरी, कार्यकर्ते आदींची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...