आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका गुन्ह्यासंदर्भात अल्पवयीन मुलगी महिला राज्यगृह येथे होती. तिला आई-वडिलांच्या ताब्यात द्यायचे होते. बालकल्याण समितीसमोर हजर करण्यासाठी नेत असताना या मुलीने अधिकाऱ्यांच्या हाताला झटका देऊन प्रियकरासोबत पळून गेली. ही घटना जालना शहरातील समाजकल्याणच्या होस्टेलजवळ १ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. महिला राज्यगृह येथून मुली पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
अंबड तालुक्यातील एक १७ वर्षे ११ महिन्यांची मुलगी ११ नोव्हेंबर रोजी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये अंबड उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून पोस्को कायद्यांतर्गत तिला महिला राज्यगृहाकडे सोपवण्यात आले होते.
दरम्यान, या मुलीने जिल्हा परीक्षा अधिकारी तथा मागील एक वर्षापासून शासकीय महिला राज्यगृहाचे अधीक्षक यांच्याकडे आई-वडिलांकडे सोपवावे यासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने अधीक्षकांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन बालकल्याण समितीच्या उपस्थितीमध्ये आई-वडिलांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू होती.
त्याच दरम्यान मुलीने वडिलांना दुसऱ्या कामात गुंतवत ठेवत अधीक्षकांच्या हाताला झटका दिला आणि जवळच उभ्या असलेल्या नागोबाची वाडी येथील तरुणाच्या दुचाकी (एमएच २१ जीएल ४०९६) वरून पळून गेली. मुलगी अल्पवयीन आणि ती सध्या महिला राज्यगृहाच्या ताब्यात होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.