आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:बेपत्ता विवाहिता होती मैत्रिणीच्या घरी; बेपत्ता मुलगा सापडला पंढरपुरात

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या प्रकरणातील एक विवाहिता व एक मुलगा असे दोघे जण बेपत्ता झाल्याची नोंद ठाण्यात झाली होती. यात तालुका पोलिसांनी तपास करून दोन्ही मिसिंगचा शोध लावला आहे. विवाहिता मैत्रिणीच्या घरी सापडली, तर घरातून कौटुंबिक वादातून बेपत्ता झालेल्या मुलाला पंढरपुरातून ताब्यात घेऊन त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिले आहे.

जालना शहरातील मंठा रोडवरील आबड प्राइड सिटीतून कविता सुरेश खरात ही महिला बेपत्ता झाली होती. मुलाला डीमार्टजवळ उभे केले आहे, असे पतीला सांगून फोन बंद करून ही महिला गायब झाली होती. यानंतर पतीने दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून त्या बेपत्ता महिलेला मैत्रिणीच्या घरून तिच्या आईच्या स्वाधीन केल्याची माहिती तालुका ठाण्याचे पोलिस कर्मचारी वसंत धस यांनी दिली. प्रल्हाद केशवराव मिसाळ ‌(दुधना काळेगाव, ता. जालना) हा मुलगाही कौटुंबिक वादातून बेपत्ता झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी वसंत धस, नागरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...