आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक:आमदार बंब यांनी शिक्षकांची माफी मागावी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक व सरकारी शाळांबाबत व्यक्त केलेले मत दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक संघटना समन्वय समितीचे नामदेव धुमाळ, आमदार, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी धुमाळ म्हणाले की, कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता व मुख्यालयी राहणे हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व कर्मचाऱ्यांना घरभाडे दिले जाते. शासनाने शिक्षकांसाठी शासकीय निवासस्थाने बांधून दिली तर घरभाडे भत्ता बंद होईल. अन्यथा अन्य कारणाने हा भत्ता बंद करता येणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार बंब यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या तर अधिवेशनात बोलण्यासाठी वेळ अपुरा पडेल. यावेळी कृती समितीचे पदाधिकारी बाबूराव पवार, बबन बोरूडे, लक्ष्मण नेव्हल आदी उपस्थित होते. दरम्यान, आमदार बंब यांच्या वक्तव्यामुळे शिक्षकांत नाराजी असून याविरोधात आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबर रोजी गंगापूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. यात आठही विभागातील शिक्षक आमदार सहभागी होतील. त्यानंतर शिक्षक कृती समिती मुंबईत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...