आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची मागणी:मंठा शहरात वानरांचा उपद्रव वाढला, बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा शहरातील सर्व प्रभागात मागील काही महिन्यापासून वानरांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्यावतीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना लेखी निवेदन देवून करण्यात आली. यावेळी बाज खा पठाण, अचित बोराडे, अरुण वाघमारे, जे.के.कुरेशी यांची उपस्थिती होती. निवेदनात म्हटले, मंठा शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून वानरांचा उपद्रव वाढला आहे.

वानराचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने वनविभागाची मदत घेऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. सिध्दार्थ अवसरमोल, बाळासाहेब वांजोळकर, अशोक आवचार, गंगाराम गवळी, मारुती खनपटे, धम्मा वाघमारे आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...