आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मोसंबी फळगळतीच्या नुकसानीची आता भरपाई ; सीएम कार्यालयाकडून दखल

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समितीच्या सदस्या शितल उढाण यांनी घनसावंगी तालुक्यात झालेल्या मोसंबीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच नुकसानीची माहिती दिली होती. दरम्यान, त्यांच्या निवेदनाची दखल घेत तालुक्यातील नुकसानीचा अहवाल मागवण्यात आला आहे. घनसावंगी तालुक्यात मोसंबीसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचायत समितीच्या सदस्या शितल पुरुषोत्तम उढाण यांनी १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पैठण दौऱ्यात घनसावंगी तालुक्यातील मोसंबी फळगळती व खरीप हंगामातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने उप आयुक्त महसूल तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद यांनी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी जालना यांना पत्र पाठवून घनसावंगी तालुक्यातील खरीपाच्या पिकांसह मोसंबी फळगळती नुकसानीचा अहवाल मागितला असुन घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसह मोसंबी फळगळती अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दिनांक १ नोव्हेंबर रोजी तहसीलदार घनसावंगी यांना पुन्हा एकदा पंचायत समिती सदस्य शितल उढाण यांनी निवेदनासह उपायुक्त महसूल तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद यांचे पत्र देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी असे निवेदन दिले आहे.

घनसावंगी तहसीलदारांना मिळाल्या सूचना
पंचायत समिती सदस्य शितल उढाण यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून घनसावंगी तालुक्यातील खरीपाच्या पिकांसह मोसंबी फळगळती नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार साहेब घनसावंगी यांना सुचना करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...