आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे वर्चस्व:घनसावंगी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व मिळवले असुन ३४ पैकी २८ ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच निवडूण आले आहेत. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने गावागावात अत्यंत अटीतटीच्या निवडणुका पार पडल्या. गावातील कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३४ पैकी २८ सरपंचांना जनतेने कौल दिल्याचे दिसून आले.

निवडूण आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सुविद्य पत्नी तथा राष्ट्रवादीच्या नेत्या मनिषाताई टोपे यांनी सत्कार करुन पेढे भरुवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...