आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भोकरदन तालुक्यातील सिपोराबाजार येथील जितेंद्र सोनवणे याने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. आरटीओ बनून त्याने आईवडिलांनी शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाचे चीज केले आहे.
भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार या छोट्याश्या गावातील जितेंद्र सोनवणे यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत आरटीओ इंस्पेक्टरपदी नियुक्ती झाली आहे. राज्य आयोगाच्या असिस्टेट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर पदाकरिता राज्यातील जवळपास ८८ हजार युवकांनी प्रीलिमरी परीक्षा दिली. त्यात चार हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरीता निवड झाली.
जितेंद्रसह २३३ जणांना या परीक्षेत यश मिळाले, पण हे यश मिळवणं तितकंस सोप नव्हत. लहान पणापासूनच जितेंद्रला अभ्यासात रस असल्याने २०१० मध्ये बारावीत विज्ञान शाखेत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला अणि त्यानंतर चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपली मेकॅनिकल मधून पदवी संपादन केली. चारही वर्षांमध्ये प्रथम येत जितेंद्रने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली. गेट परीक्षेतदेखील चांगले गुण मिळाल्यामुळे उच्च शिक्षणासाठी आयआयटी पवई येथून एमटेक पुर्ण केले व त्यानंतर कॅम्पसमध्येच एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली.
मुळातच अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलेल्या जितेंद्रला नोकरीमध्ये मन रमेना. अडीच वर्ष नोकरी करून जितेंद्रने कंपनीचा राजीनामा दिला व घर गाठले आणि येथूनच अधिकारी बनण्याचा प्रवास सुरू झाला. स्पर्धा परीक्षा शिकवणीकरिता मोठा खर्च टाळून जितेंद्रने घरीच अभ्यास सुरू केला व संघर्ष मय जीवनातून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे पद मिळवले. वाचनालयातून पुस्तके आणून त्याने ही तयारी केली.
संघर्षाचा काळात अनेक प्रसंग जितेंद्र ला भेडसावत होते. मात्र तो काही डगमगला नाही व त्यानी आपला प्रवास सुरू ठेवला. अखेर त्याने ते यश मिळविले. एमपीएससी परीक्षेच्या पाहिलच प्रयत्नामधे आरटीओ निरीक्षक होण्याचा बहुमान मिळविला. तसेच राज्यसेवा परीक्षा-२०२१ च्या मुलाखती साठीही जितेंद्र पात्र झालेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.