आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांचे प्रतिपादन:मदर तेरेसा यांनी आपल्या जीवनात सामाजिक बांधिलकी काय असते हे सेवेतून दाखवून दिले

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न मदर तेरेसा यांनी आपल्या जीवनात गोरगरीब, दीन दुबळ्याची आणि कुष्ठोग्यांची सेवा करून समाजाला सामाजिक बांधिलकी काय असते हे सेवेतून दाखवून दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ परिचारिका यांनी आपल्या जीवनात त्यांची मूलतत्त्वे स्वीकारावी, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केले.

ख्रिस्ती समाज समन्वय समिती महाराष्ट्र संलग्न इंडियन ख्रिश्चन्स युनायटेड ब्रिगेडच्यावतीने भारतरत्न मदर टेरेसा यांची जयंती जिल्हा सामान्य रुग्णालयात साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ख्रिस्ती समाज समन्वय समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा इंडियन ख्रिश्चन्स युनायटेड ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष रविकांत दानम, उपाध्यक्ष भोला कांबळे, ब्रिगेडचे संस्थापक संस्थापक सचिव लेवी निर्मल, शल्य चिकित्सीक डॉ. प्रताप घोडके, डॉ. उदयन परितकर, डॉ. अपर्णा साळुंखे, डॉ. संजय सोळंके यांची उपस्थिती होती. डॉ. भोसले म्हणाल्या, भारतरत्न मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे गोरगरीब आणि कुष्ठरोगी यांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांची सेवा, शुश्रुषा करत त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. मूळच्या परदेशीतील मॅसेदोनिया येथे जन्मलेल्या मदर तेरेसा यांनी भारतातील गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. त्यामुळे परिचारिका शिक्षण घेत असलेल्या शिकाऊ परिचारिकांनी त्यांचे जीवन मूलतत्त्वे स्वीकार करून भविष्यात त्यांच्याप्रमाणे त्यांनी रुग्णसेवा करावी, असे आवाहन केले. यावेळी प्रवीण कांबळे, निखिल अर्सुड, सुशील भिसे, शमुवेल भोसले, शाम ससाणे, वैभव निर्मल, जॉन हतागळे, विवेक गायकवाड, दीपक झारखंडे, योगिता काकडे, सुधीर बाहेते, भाऊलाल साठे यांच्यासह नर्सिंग ट्रेनिंग स्कूलच्या परिचारका उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...