आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदर्स डे विशेष:5 वर्षांच्या मुलीला बिबट्या तोंडात धरून फरफटत नेत होता, आईने काठी घेऊन त्याला पळवून लावत मुलीचा वाचवला जीव

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जी आई गायीलाही घाबरत होती, तिने मुलीचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी केले दोन हात

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोरा गावात वर्षभरापूर्वी घडलेला हा थरारक प्रकार आहे. या घटनेला वर्ष उलटले असले तरी या प्रसंगाच्या नुसत्या आठवणीने अर्चनाच्या डोळ्यात पाणी येते.

आई अर्चना व पाच वर्षांची मुलगी प्राजक्ता जंगलात गेली असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राजक्तावर हल्ला करत फरफटत नेले. आई जिवाच्या आकांताने मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडू लागली. मात्र सर्वत्र जंगल असल्याने कुणाचीही मदत मिळाली नाही. मुलीचा जीव वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता तिने बाजूलाच पडलेली एक मोठी काठी उचलली अन् बिबट्याचा पाठलाग केला. काठीचे दोन रट्टे पाठीत पडताच बिबट्याच्या जबड्यातून ती चिमुकली खाली पडली अन् बिबट्या जंगलाकडे पळाला. रणरागिणीपुढे बिबट्याची माघार

डोक्यावर अन् तोंडावर जखम अर्चना म्हणते, मी गायीलाही घाबरते. मात्र बिबट्याने माझ्या पाेटच्या गोळ्याला उचलून गेले, तेव्हा काहीही करून मुलगी वाचली पाहिजे, हाच विचार माझ्या मनात होता. संपूर्ण शक्ती एकवटत मी त्याच्या मागे धावले अन् त्याच्या जबड्यातून मुलीची सुटका केली. बिबट्याच्या दातांमुळे डोक्यावर व तोंडावर जखम झाली होती. तिच्यावर उपचार करण्यात आल्याने प्राजक्ता पूर्णपणे बरी झाली असून ती व मी सुरक्षित आहे.

1. बिबट्याने झडप मारत मुलीला फरफटत नेले
जुनोरा गावाशेजारीच मोठे जंगल आहे. अर्चना जंगलात गेली असताना मुलगी प्राजक्ता ही आईच्या पाठीमागेच जंगलात गेली. बिबट्याने प्राजक्तावर झडप व जबड्यात धरून फरफटत नेले. हे पाहून अर्चना प्रचंड घाबरली. तिने प्रचंड शक्ती एकवटून मदतीसाठी याचना केली. मात्र कुणीही मदतीसाठी आले नाही.

2. बिबट्याचा पाठलाग करत त्याच्या पाठीत मारली काठी
आपल्या मदतीला अन् मुलीचा जीव वाचवण्यासाठी कुणीही येणार नाही, हे निदर्शनास आल्याबरोबर क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवण्यासाठी अर्चनाने बाजूलाच पडलेली एक मोठी काठी उचलली अन् प्रचंड ताकदीने ती बिबट्या मागे धावत सुटली. बिबट्याला गाठले अन् एकापाठोपाठ एक असे दोन-तीन रट्टे बिबट्याच्या पाठीत घातले.

3. जबड्यातून प्राजक्ता खाली पडली अन् बिबट्या पळाला
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बिबट्याच्या जबड्यातून प्राजक्ता खाली पडली. बिबट्या जंगलाच्या दिशेने आत गेला. तिने रक्तबंबाळ झालेल्या चिमुरड्या प्राजक्ताला जवळ घेतले, मुलीचा जीव वाचला. मात्र तिची अवस्था पाहून रडू लागली. मुलगीही प्रचंड घाबरली होती. आई लवकर घरी चल, असे ती म्हणत होती.

4. मायलेकींच्या दिशेने पुन्हा तो आला अन् ती तुटून पडली
तोच डरकाळी फोडत बिबट्या पुन्हा या मायलेकींच्या दिशेने येऊ लागला. अर्चनाने प्राजक्ताला बाजूला ठेवले अन् हातात असलेली काठी जमिनीवर जोरात आपटली. तसेच अर्चनासोबत जंगलात आलेल्या एका वृद्ध महिलेच्या हातातील कुऱ्हाड घेऊन बिबट्यावर तुटून पडली. हे रौद्ररूप पाहून बिबट्याने जंगलात धूम ठोकली.