आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्सव रॅली‎:सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील‎ सिव्हिल क्लबचे कार्य प्रेरक

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत शिरोमणी गुरू रविदास महाराज सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी दुपारी छत्रपती‎ संभाजी महाराज उद्यान येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली शनी मंदिर ते गांधी चमन छत्रपती शिवाजी‎ महाराज पुतळा चौक-पाणीवेसमार्गे मस्तगड येथे आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार‎ अर्पण करत अभिवादन केल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व बाजार‎ समिती उपसभापती भास्कर दानवे यांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन झाले. यावेळी बन्सीदास भगुरे, डी. एस.सोनवणे,‎ फुलचंद पिंपळे, अॅड. दशरथ इंगळे, व्ही. एस. सोनवणे, बन्सीलाल ढवळे, दुर्गेश कुरील, गणेश भगुरे, अनिल शिलगे,‎ दीपक डोंगरे, ईश्वर बिल्होरे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...