आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लब ची उभारणी:सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील‎ सिव्हिल क्लबचे कार्य प्रेरक‎‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात १९३५ पासून‎ सिव्हिल क्लब कार्यरत आहे. रेव्ह.‎ डब्ल्यू. ई. बिलकिये, ब्राऊन सेट,‎ बेजनजी जालनावाला, मोतीलाल‎ सेठ हिरा खानवाले, बिहारीलाल‎ भक्कड यांच्या अथक प्रयत्नामुळे‎ सिव्हिल क्लब ची उभारणी झाली.‎ अनेक प्रयत्नानंतर क्लब मध्ये‎ पारसी समुदायव्यतिरिक्त इतर‎ समाजातील नागरिकांचा समावेश‎ करण्यात आला.

क्लबचे कार्य‎ प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन‎ हरिकिशन अग्रवाल यांनी केले.‎ सिविल क्लब ने आपत्ती निवारण‎ अंतर्गत शासकीय आव्हानांना‎ प्रतिसाद देत राष्ट्रीय सहायता‎ निधीसाठी क्लबच्या वतीने सहकार्य‎ करण्यात आले. अनेक आरोग्य‎ शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे‎ आयोजन करण्यात आले. नुकतेच‎ क्लब कडून जालना शहरातील‎ नागरिकांना क्लबच्या माहितीसाठी‎ सिव्हिल क्लब काल, आज आणि‎ उद्या या विशेषांकाचे प्रकाशन‎ करण्यात आले. समितीचे सदस्य‎ सुनील कुमार चोरडिया, अर्जुनजी‎ गेही, ओमप्रकाश मंत्रीसह सर्वांचे‎ सहकार्य लाभल्याचे हरीकिशन‎ अग्रवाल यांनी सांगितले. या‎ विशेषांकातील काही निवडक‎ लेखांचे संपादक डॉ. श्रीपत यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...