आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची दुरवस्था:राजूर फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था, काम रखडल्याने वाहनधारक त्रस्त

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते देऊळगाव राजा रस्त्यालगत राजुर फाटी दरम्यान रस्त्याचे काम रखडल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणी दररोज वाहनधारक अपघातग्रस्त होत असून या रस्त्याची दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान भोकरदन ते देऊळगाव राजा या ३३० कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामांतर्गत राजुर फाटा रस्त्याचे काम येत आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे सदर काम रखडले होते सद्यस्थितीत यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून लवकरच कामाला प्रारंभ होईल, असे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

टेंभुर्णी ते देऊळगाव राजा रस्त्यादरम्यान राजुर ला जोडणाऱ्या राजुर फाट्यालगत रस्त्याचे काम रखडले होते. या ठिकाणी तीन भागांना जोडणारी त्रिफुली आहे. दरम्यान राजूरकडून येणारा टेंभुर्णी कडून येणारा व देऊळगाव राजाकडून येणारा या तीनही बाजूची जवळपास शंभर ते दीडशे मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे या तीनही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज नाल्याने अनेक अपघात झाले आहेत.

यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी या रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या संदर्भात सार्वजनिक विभागाचे सहाय्यक अभियंता भुरेवाले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदर रस्त्याचे काम जागतिक बँक प्रकल्पांतर्गत होत असून त्या विभागाच्या संबंधित अभियंत्यास कळवून खड्डे भरून घेतल्या जातील. आपण स्वतः या भागाची पाहणी केली असल्याचे भुरेवाले यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्यावरुन वाहनांची सतत वर्दळ असल्याने खड्डयामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

लवकरच काम सुुरू होईल
भोकरदन ते देऊळगाव राजा या सिमेंट रस्त्यासाठी आपण ३३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहेत काही अपवादात्मक स्थितीमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने काम रखडले होते परंतु सद्यस्थितीत तांत्रिक अडचणी दूर झाले असून लवकरच या रस्त्याच्या कामांना प्रारंभ होणार आहे तसेच सूचना आपण संबंधितांना दिले आहेत.
संतोष दानवे, आमदार, भोकरदन जाफराबाद मतदारसंघ

दररोज या रस्त्यावर होतात छोटे-मोठे अपघात
राजुर फाटी लागत असलेल्या देऊळगाव राजा रस्त्यावर पाच ते सहा मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दररोज रात्री या ठिकाणी दुचाकी स्वार पडून अपघात होतात यामुळे या रस्त्याचे काम त्वरित निकाली काढावे, अशी मागणी टेंभूर्णी येथील नागरिक मनीष कुलथे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...