आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहीम:वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या अंबडमधील वाहनधारकांची हवा गुल

अंबड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातून शहरात येणारे दुचाकी चारचाकी वाहनांची आवाजावी आणि शहरातील वाहन धारक नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर कुठेही आणि कशाही गाड्या लावतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. गुरुवारी पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी आपल्या फौजफाटयासह जालना बीड रोडवरील अस्ताव्यस्तपणे उभी करण्यात आलेली वाहनांची हवा सोडून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तंबी दिली. शहरात रस्त्यावर कुठेही वाहने उभी करण्याचे प्रकार वाढत आहे. यात दुचाकी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहने उभी केल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. यामुळेही वाहतूकीला अडथळा येतो. त्यामुळे पोलिसांनी अचानक गुरुवारी सकाळी अशा वाहनांवर कार्यवाही करण्याची मोहीम राबवल्याने वाहनधारकात खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...