आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिसर्गप्रेमी, गिर्यारोहक असलेले विनोद सुरडकर हे सातत्याने पर्यावरणपूरक उपक्रम राबवतात. शुक्रवारी त्यांची लेक वसुंधरा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी अशीच निसर्गप्रेमी शक्कल लढवली. दुर्मिळ, देशी वृक्षांच्या बियांनी बीज तुला करुन त्यांनी लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.
लेकीचे वजन 10 किलो असले तरी त्यांनी यवतमाळ, वाशिम,बीड, सोलापूर या चार जिल्ह्यातून पर्यावरणप्रेमींच्या मदतीने 12 किलो वृक्षांच्या बिया या उपक्रमासाठी गोळा केल्या आहेत. विनोद व सपना सुरडकर या दाम्पत्याने लेकीच्या जन्मापासून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळेच लेकीचे नामकरण त्यांनी थेट कळसूबाई शिखरावर केले होते.
पर्यावरणप्रेमींची उपस्थिती
आता वाढदिवसही अशाच अनोख्या पद्धतीने साजरा करणार करण्यात आला. जालना नजीकच्या पारसी टेकडीवर शुक्रवारी सकाळी 7 वाजता अनोख्या उपक्रमाने हा वाढदिवस साजरा झाला. यावेळी पारसी टेकडी संवर्धनासाठी काम करणारे उद्योग,व्यापार, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पर्यावरणप्रेमींची उपस्थिती असणार आहे. पर्यावरणाप्रती जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवल्याचे विनोद सुरडकर यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यांपासून ते या अनोख्या संकल्पनेवर काम करित होते. त्यासाठी त्यांनी स्वत: विविध ठिकाणी फिरुन देशी व दुर्मिळ वृक्षांच्या बिया संकलित केल्या. याशिवाय पर्यावरणप्रेमी मित्रांकडून त्यांनी बिया संकलित केल्या.
पालखी मार्गावर टाकणार सीड बॉल
वसुंधरा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ज्या साडेबारा किलो बिया गोळा करण्यात आल्या होत्या त्यापैकी काही बियांचे रोपण पारसी टेकडी येथे केले जाणार आहे. तर उर्वरित बियांचे शास्त्रशुध्द पध्दतीने सीड बॉल तयार करुन ते आळंदी ते पंढरपूर या दिंडी मार्गावर टाकले जाणार आहे.
या झाडांच्या बियांचा समावेश
सुरडकर यांनी कमी झाडांच्या बिया गोळा करताना ती साडे सावली देणारी व पक्षांना पळे देणारी असावी हा विचार केला आहे. त्यामुळेच यात त्यांनी सावरी, ढेऱ्या, साग, गुलमोहर, बकूळ, काशिद, चिंच , पेल्ट्रोफाम, करंज, लींब, पेरु, आंबा, वड, जांभुळ आदी झाडांच्या बियांचा समावेश आहे.
11 वृक्षांची राेपटीही लावणार
वाढदिवसानिमित्त लेकीची बीज तुला करुन सुरडकर कुटूंब थांबणार नसुन त्यांनी यानिमित्ताने वड,आंबा, लिंब यांची 11 झाडे लावण्याचे ठरवले आहे. पावसाळा सुरु हाेण्यासाठी एक महिना असल्याने पुढील महिनाभर झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वत: तयारी केली आहे. त्यामुळे ही 11 झाडे लावून त्यांचे जतन करायचे व दरवर्षी यात भर टाकायची असा त्यांचा संकल्प आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.