आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंतराव ग्रामीण भागातील मुलींनी आत्मनिर्भर बनायला पाहिजे. समोर ध्येय ठेवल्यास यश हमखास मिळते. शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजे, असे निर्मलाताई दानवे यांनी सांगितले.
भोकरदन तालुक्यातील तादुंळवाडी येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या वेळी माजी नगराध्यक्षा आशा माळी, रामेश्वर कारखान्याच्या शोभा मतकर यांची उपस्थिती होती. तांदुळवाडीत श्री छत्रपती संभाजी विद्यालय केंद्रीय राज्य मंञी रावसाहेब दानवे यांनी सुरू केले. त्यामुळेच परिसरातील शेतकऱ्यांची मुले, मुली बारावीपर्यंत सुरक्षित शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर एक ध्येय असायला हवे, ते असेल तर तो प्रगती करु शकतो. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनात भिती न बाळगता प्रत्येक संकटावर मात करावी.
आपल्या आयुष्यात एक ध्येय उराशी बाळगायला हवे. काय व्हायचे, काय बनायचं हे आपण आतापासूनच ठरवायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासून करायला हवी. ग्रामीण विद्यार्थीनीनी आत्मनिर्भर बनावे. भविष्यात आपल्याला मोठे अधिकारी बनायचेअसे ध्येय बाळगावे, असे आवाहन केले. प्रारंभी प्राचार्य संजय पैठणकर यांनी स्वागत केले. यावेळी के. व्ही. फुके, पी. एम. पाटील, राजेंद्र डेडवाल, प्रा. भगवान जाधव, प्रा.अंकुश जाधव, मोहित जयस्वाल, प्रा. आशा ठाकूर, उषा खैरे, कमल सोनुने, जे. एच. सुरासे, एच. यु. गव्हाड, तुषार फुके आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.