आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:जांबसमर्थ येथील मूर्तीचोरीच्या निषेधार्थ परतूर शहरात विहिंपतर्फे आंदोलन ; महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

परतूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या वतीने जांबसमर्थ येथील मूर्ती चोरीच्या प्रकरणी तसेच आंबा येथील गाईंच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. वरील दोन्ही घटनांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या बाबत एसडीएम आणि पोलीस यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जांबसमर्थ या ठिकाणी श्रीरामाचे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये ७०० वर्षांपूर्वीच्या श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि वीर हनुमानाच्या पंचधातूच्या मुर्त्या होत्या,त्या मुर्त्या अज्ञातांनी मागील १० दिवसांपूर्वी चोरून नेल्या त्यामुळे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आंबा गावात पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेत बागेश्वरी देवीच्या मंदिरातील गाईंचा विद्युत तारांना धक्का लागून मृत्यू झाला.झालेली ही घटना संशयास्पद असल्याची गावकरी सांगत आहेत.संबंधित घटना घातपात असल्याने या घटनेचा पूर्ण तपास करून घटनेला जबाबदार असणाऱ्याला योग्य शिक्षा करण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.झालेल्या आंदोलनात आंबा येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

निवेदनावर सुभाष अंभुरे, मसलकर, डि. वाय. काटे, भगवान मोरे, मुरलीधर देशमुख, गोविंद सातोनकर, सावता काळे, डॉ.कल्याण बोनगे, डॉ. सुधीर आंबेकर, नामदेव कोरडे, बाळू पठाडे, सतीश बोनगे, बालासाहेब बोनगे, गोरखनाथ झिंजाडे, बाबुराव राऊत, अनिल देशपांडे, विठ्ठल कुलकर्णी, तुळशीराम निकाळजे, हेमंत कुलकर्णी, दत्ता देशपांडे, सचिन काटे, तुकाराम बोनगे, डिगांबर झिंजाडे, शिवाजी झिंजाडे आदींची उपस्थिती होती. तहसील कार्यालय ते पोलिस स्टेशन दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली. दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे,सपोनि सचिन पुंडगे, शिवाजी नागवे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात होता.

बातम्या आणखी आहेत...