आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:उपोषणाला बसलेल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यासाठी किसान सभेचे आंदोलन

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभा यांनी उपोषणास बसलेल्या कुटुंबीयांना पाठींबा देऊन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.

पारधी समाजाच्या लोकांची नावे सातबारावर आलेली आहे. त्याप्रमाणे इतर लोकांची नावे सातबारावर घेण्यात यावी, गायरान जमिनीवर कास्त करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरता शासनामार्फत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी द्यावी अादी मागण्यांसाठी काही कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. या कुटुंबीयांना पाठींबा म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भास्कर लहाने, संतोष धांडे, कैलास कांबळे, सुशीला भोसले, सुरेश खवणे, प्रल्हाद पडूळ, दशरथ चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...