आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त पूर्वपरीक्षा 2022:उद्या एमपीएससीची परीक्षा; केंद्राच्या परिसरात असेल कलम 144 लागू

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट - ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२२ येत्या ८ ऑक्टोबर रोजी जालना शहरातील विविध उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ८ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत केंद्र परिसरात कलम १४४ लागू असणार आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी हे आदेश काढले आहेत.

मत्स्योदरी शिक्षण संस्था संचालित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (दोन्ही नागेवाडी, औरंगाबाद रोड, जालना), बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय (नवीन एमआयडीसीजवळ, औरंगाबाद रोड), अंकुशराव टोपे महाविद्यालय (मोतीबागेजवळ), श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला (टाऊन हॉलजवळ), सीटीएमके.

गुजराती हायस्कूल (मुथा बिल्डिंगजवळ, सरोजिनीदेवी रोड), एम.एस. जैन (इंग्रजी माध्यम) (फुलंब्रीकर नाट्यगृहाजवळ), एम.एस. जैन (मराठी माध्यम) (गणेशनगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ), नूतन महाविद्यालय (छत्रपती कॉलनी), जेईएस कॉलेज (दुर्गामाता रोड), उर्दू हायस्कूल अँड उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स (मोतीबाग रोड, काली मशिदीसमोर), जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल (जे.ई.एस. कॉलेजजवळ), राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय (इंग्रजी माध्यम) व राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय, सेंट मेरी हायस्कूल (तिन्ही देऊळगावराजा रोड), श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय (श्री गणपती नेत्रालयाजवळ) या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम १४४ लागू असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...