आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:पूनम म्हस्के यांना मिसेस महाराष्ट्र पुरस्कार प्रदान, टेंभुर्णीत सत्कार; इनाना प्रोडक्शन मुंबईने घेतली होती स्पर्धा

टेंभुर्णी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पूनम गौतम म्हस्के यांना मिसेस महाराष्ट्र डिवाइन ब्यूटी सन्मान प्राप्त झाला आहे. इनाना प्रोडक्शन मुंबईतर्फे आयोजित ही स्पर्धा नुकतीच पुणे येथे संपन्न झाली. त्यात पूनम म्हस्के यांना हा किताब मिळाला आहे. नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

पूनम म्हस्के ऊर्फ पूनम भट या सध्या जालना पोलिस दलात पोलिस नाईक पदावर कार्यरत आहेत. या यशाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, राखीव पोलिस निरीक्षक पुंडलिक आगारकर, टेंभुर्णीच्या सरपंच सुमन म्हस्के यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे. पुनम म्हस्के या टेंभुर्णीच्या सरपंच सुमन म्हस्के यांच्या स्नुषा तर टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम म्हस्के यांच्या पत्नी आहेत.

दरम्यान, या पुरस्काराबद्दल टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा रविवारी संत सावता मंगल कार्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला आहे. समस्त ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. टेंभुर्णीसारख्या गावाला अशा प्रकारचा मान प्रथमच मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...