आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार जाहीर:विंदा महाजन व चंदनशिवे यांना मुद्राचे पुरस्कार जाहीर

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुद्रा साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आदर्श विधिज्ञ पुरस्कार पुणे येथील विंदा महाजन, मुद्रा साहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील डॉ. सुनील चंदनशिवे, तर आदर्श शिक्षक पुरस्कार जालिंदर लाड यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती कवी कैलास भाले यांनी दिली. मुद्रा साहित्य संस्थेतर्फे दरवर्षी विधी, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो.

राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार वेणुताई विश्वनाथ भाले तसेच राज्य आदर्श विधिज्ञ पुरस्कार मोरेश्वर अंबादास अंभोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येतो. तेरा वर्षांपासून सातत्याने राज्यातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. रोख रक्कम ५ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व यथोचित सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्या आणखी आहेत...