आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे विद्युतीकरण कामाचा शुभारंभ:मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा अहवाल लवकरच; औरंगाबादकर पावणेदोन तासात गाठणार मुंबई

जालना7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : अनिल व्यवहारे - Divya Marathi
छाया : अनिल व्यवहारे

देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्यात तयार होणार आहे. या बुलेट ट्रेनमुळे औरंगाबाद -मुंबई हे अंतर केवळ एक तास चाळीस मिनिटांत गाठता येणार आहे. या प्रकल्पासाठी केवळ ३८ टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्याशिवाय ज्या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार नियमानुसार ५० टक्के हिस्सा देईल तो रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालय पूर्ण करणार असल्याचेही दानवे यांनी या वेळी सांगितले. ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करून देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे चालवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जालना ते मनमाड या रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते जालना येथे बोलत होते.

नांदेड ते मनमाड या ३८४ किमी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, अतुल सावे, नारायण कुचे, प्रशांत बंब, राजेश टोपे, भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात औरंगाबाद ते मनमाड आणि दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड अशा पद्धतीने या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. देशात ७ बुलेट ट्रेन होत आहेत. त्यात मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काम सुरू झाले आहे, तर वाराणसी-दिल्ली या मार्गाचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. देशातील तिसरी बुलेट ट्रेन ही मुंबई-नागपूर असेल असे दानवे यांनी या वेळी सांगितले. या बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर महिनाभरात तयार होईल. या मार्गासाठी केवळ ३८ टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. उर्वरित जमीन राज्य सरकारकडे असल्याचे दानवे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाला समांतर अशी ही बुलेट ट्रेन होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद -मुंबई हे अंतर केवळ एक तास ४० मिनिटांत गाठता येणार आहे. अधिकाऱ्यांची मुजोरी : दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी मुजोर आहेत. चार वेळा फोन केला तर ते एकदा फोन घेतात. हा अनुभव सांगितला आहे चक्क केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी. दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी मराठवाड्यातल्या लोकांना किंमत देत नाहीत असेही भागवत कराड यांनी भर सभेत जाहीरपणे सांगितले.

बुलेट ट्रेनला शेंद्रा येथून वळसा
समृद्धी महामार्गाला समांतर अशा पद्धतीने नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन होणार आहे. परंतु समृद्धी महामार्ग औरंगाबाद शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहारापासून इतक्या लांब रेल्वेस्थानक नको अशी भूमिका रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. त्यासाठी बुलेट ट्रेन शेंद्र्यापासून वळसा घेऊन सध्याच्या प्रचलित रेल्वेमार्गाने औरंगाबाद शहरातील मुख्य रेल्वेस्थानकावर येईल. तेथून पुढे पुन्हा ती समृद्धी महामार्गाला जोडली जाईल.

शंभर टक्के विद्युतीकरण
रेल्वेने सर्व ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार २०२३ पर्यंत सर्व मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होईल. मनमाड -नांदेड या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून वंदे भारत रेल्वे सुरू करता येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

वीस हजार कोटींची वाढ
या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २० हजार कोटींची वाढ केली, असे अर्थ राज्यमंत्री कराड यांनी सांगितले. रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा. औरंगाबादहून नगर मार्गे पुणे रेल्वे सुरू करावी, औरंगाबाद-कन्नड-चाळीसगाव-धुळे, लातूर-नांदेड हा रेल्वेमार्ग व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

ब्रॉडगेजचे विद्युतीकरण करून ४०० वंदे भारत रेल्वे चालवणार
आला. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, अतुल सावे, नारायण कुचे, प्रशांत बंब, राजेश टोपे, भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात औरंगाबाद ते मनमाड आणि दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड अशा पद्धतीने या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. देशात ७ बुलेट ट्रेन होत आहेत. त्यात मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काम सुरू झाले आहे, तर वाराणसी-दिल्ली या मार्गाचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. देशातील तिसरी बुलेट ट्रेन ही मुंबई-नागपूर असेल असे दानवे यांनी या वेळी सांगितले. या बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर महिनाभरात तयार होईल. या मार्गासाठी केवळ ३८ टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. उर्वरित जमीन राज्य सरकारकडे असल्याचे दानवे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाला समांतर अशी ही बुलेट ट्रेन होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद -मुंबई हे अंतर केवळ एक तास ४० मिनिटांत गाठता येणार आहे. अधिकाऱ्यांची मुजोरी : दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी मुजोर आहेत. चार वेळा फोन केला तर ते एकदा फोन घेतात. हा अनुभव सांगितला आहे चक्क केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी. दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी मराठवाड्यातल्या लोकांना किंमत देत नाहीत असेही भागवत कराड यांनी भर सभेत जाहीरपणे सांगितले.

जालना-मनमाड या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ करताना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. साेबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे आदी.

बातम्या आणखी आहेत...