आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना नगरपालिकेमध्ये अकाउंटंट पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने राहत्याघरात नायलाॅन दोरीनेपंख्याला गळफास घेऊनआत्महत्या केली. ही घटनाखरपुडी रोडवरीलहरिगोविंदनगर येथेबुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. अनंता भीमाशंकर लांडे (५१) असे मृताचे नाव आहे. माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सय्यद माजिद, पोलिस कॉन्स्टेबल किशोर जाधव, हेड कॉन्स्टेबल संदीप बेराड यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी तसेच अनेक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्रभरापासून ते मानसिक तणावमध्ये होते. रात्री तीन वाजता ते घरातून विहिरीमध्ये उडी घेण्यासाठी निघाले असताना पत्नीने त्यांना समजावून ओढून घरात आणले. मात्र, घरात येताच त्यांनी रूममध्ये प्रवेश केला आणि आतमधून कडी लावून घेतली. बराच वेळ पत्नी घराबाहेरच थांबून होती, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.