आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिटू प्रणित मराठवाडा नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे नेतृत्वाखाली १७ मार्च रोजी जालना नगरपालिकेसमोर तीव्र निदर्शने करून चौथ्या दिवशीही सफाई कामगारांचा संप सुरूच ठेवला आहे. कामगाराच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील वीस लाखाच्या वर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी नगरपालिकेतील कर्मचारी सहभागी आहेत. संपकऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे अध्यक्ष मधुकर मोकळे म्हणाले, कामगार आज जागृत झाला आहे.
एकत्रितपणे त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पण ह्या आंदोलनात फूट पाडण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत. पण जोपर्यंत मागणी मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहील. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी नगरपरिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र लोखंडे, संतोष पाटोळे, संजय खंडागळे, लताबाई टेकूर, संजय जगधने यांच्यासह सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.