आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:फळविक्री करणाऱ्या तरुणाची अज्ञातांकडून हत्या, रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह; शहरात खळबळ

जालना5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात येऊन अज्ञात आरोपींनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. भरत मुजमुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहरातील डबलजीन भागात ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

फळविक्री करणाऱ्या तरुणाची अज्ञाताने हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी निरंजन राजगुरु कदीम जालना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कोनवडे, सय्यद खलील रत्नपारखे, राठोड, हिवाळे, कचरे, पवार, यांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. या हत्येमागील कारण अजून समोर आलेलं नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येप्रकरणी पोलिस अधिक तपास करतायत.

बातम्या आणखी आहेत...