आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पैशाच्या कारणावरून 15 वर्षीय मुलाचा खून, घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील घटना

कुंभार पिंपळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून मुलाला शेतात बोलावून घेत डोक्यात दगड मारला तर एकाने गळा दाबून खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथे ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. अनिकेत घुगे (१५) असे मृताचे नाव तर महादेव नामदेव शिंदे (१९), आकाश भागवत शिंदे (१९) अशी आरोपींची नावे आहेत.

भाऊसाहेब शिवराम घुगे (४५) यांनी फिर्याद दिली. मुलगा अनिकेत हा एका जयंतीच्या कार्यक्रमात गेला होता. तेव्हा त्याला महादेव शिंदे व आकाश शिंदे यांनी शेतात नेले. मोबाइल फोन लावला तर अनिकेतने फाेन उचललाच नाही. पोलिसांनी महादेव शिंदे यास उचलून चौकशी केली असता, हा प्रकार समोर आला. दरम्यान, दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे, उपनिरीक्षक पांडुरंग माने, रामकृष्ण कुटे, आत्माराम घुले, भागवत खरात, रंजित खटावकर, राधेशाम गुसिंगे, विजय पवार आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...