आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:लोखंडी हत्याराने वार करुन झोपेत असलेल्या तरुणाचा खून; जालन्याच्या टिव्ही सेंटर भागातील घटना

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर बाजेवर झोपेत असलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने वार करुन तरुणाचा खून केल्याची घटना जालना शहरातील सारवाडी रोडवरील टिव्ही सेंटर भागातील मुख्य रस्त्यावर घडली आहे.

प्रमोद जनार्दन झिने (39) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळाजवळच जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या खूनाचे कारण अजून स्पष्ट झाले नाही, पाेलिसांकडून तपास सुरु आहे.

नेमके प्रकरण काय?

मृत प्रमोद झिने एका कंत्राटदाराकडे चालक म्हणून काम करीत होता. तो रात्री घरी येऊन बाजेवर झोपला होता. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येऊन झिने यांच्या डोक्यावर, मानेवर, शरीरावर इतर ठिकाणी धारदार शस्त्राने वार करत त्याला मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीत प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर मृतदेहावर कपडा टाकून पळून गेले होते. सकाळी त्याची पत्नी, वडील यांनी आवाज दिल्यानंतरही उठत नसल्यामुळे नातेवाईकांनी कपडा ओढून पाहिले तर प्रमोद झिने हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर घरात एकच आरडाओरड सुरु झाली. यानंतर पोलिसांनी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

घटनास्थळी तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, पोलिस उपनिरीक्षक हरीश राठोड, वसंत धस पाटील, रामराव चापलकर, उदलसिंग जारवाल आदींनी भेट देऊन पाहणी केली आहे. खून कुणी केला, रात्री इकडे कोण आले, मयताचे कुणाशी वैमनस्य होते का या सर्व बाबींचा तपास करुन पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.