आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:लालवाडी शिवारामध्ये मामाकडून भाच्याचा खून

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारातील शेतातील रस्त्यावर काट्या का टाकल्या या कारणावरून मामाने त्याच्या दोन मुलांच्या मदतीने भाच्याचा खून करुन धनगर पिंप्री-हस्तपोखरी शिवारातील तलावात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी लालवाडी येथे घडली. या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला. योगेश भुजंगराव सुळसुळे (२५) असे मृताचे नाव आहे.

लालवाडी येथील योगेश भुजंगराव सुळसुळे हा ५ डिसेंबरपासून बेपत्ता होता. ७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धनगर पिंप्री-हस्तपोखरी शिवारातील एका तलावात योगेशचा मृतदेह आढळला. ओळख पटवण्यासाठी लालवाडी येथील हरवल्याची नोंद असलेल्या योगेश सुळसुळे याच्या कुटुंबीयांना बोलावले असता त्याच्या भावाने हा मृतदेह माझ्या भावाचाच असल्याचे सांगितले. मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी ज्ञानेश्वर किसन शिंदे, रामप्रसाद ज्ञानेश्वर शिंदे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तिसरा संशयित आरोपी शिवप्रताप ज्ञानेश्वर शिंदे हा फरार आहे.

बातम्या आणखी आहेत...