आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:यूपीएससी तयारी करताना सातत्याने वाचन हवे: सुरभी गोयल

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंबडी आधी की पिल्लू या सारखे प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारले जात नाहीत, तयारी करतांना यूट्यूब पेक्षा नियमित वर्तमान पत्र, संदर्भ ग्रंथ, विषय निहाय पुस्तके वाचावीत. दररोज आठ तास अभ्यास करावा. असा सल्ला आयएफएस सुरभी गोयल यांनी दिला.

रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन व यंग जायंट्स ग्रुप जालना यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील करिअर च्या संधी “ या विषयावर सुरभी गोयल यांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेण्यात आले. अध्यक्ष स्थानी रोटरीचे प्रांतपाल रो. डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे हे होते. उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादीया, अॅड. अनुप धन्नावत, सहायक प्रांतपाल महेश माळी, अग्रविभूषण सुभाषचंद्र देवीदान, रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. अॅड. महेश धन्नावत, प्रशांत बागडी, यंग जायंट्स फेडरेशनच्या अॅड. अश्विनी धन्नावत, अॅड. बॉबी अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरभी गोयल यांनी विधीज्ञ पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण अभियांत्रिकी पदवी नंतर युपीएससी चा मार्ग निवडला, असे नमूद करत वर्षभर नियमीतपणे आठ ते साडेआठ तास अभ्यास, मुख्य परिक्षेसाठी केलेली विषय निहाय तयारी, याबाबत माहिती दिली. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी केली तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळू शकते. असे सांगून फेब्रुवारी मध्ये परिक्षेची जाहिरात येते पदवी च्या अंतिम वर्षाची परिक्षा दिलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. मुलाखतीसाठी दिल्ली येथे टॉप क्लासेस आठ ते दहा दिवसांत तयारी करून घेतात. अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सुरभी गोयल यांनी उत्तरे दिली.

अॅड. महेश धन्नावत यांनी डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाईल असे सांगितले. सुत्रसंचालन अॅड. अश्विनी धन्नावत यांनी तर अॅड. बॉबी अग्रवाल यांनी आभार मानले. यावेळी कस्तुरी धन्नावत, अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड. राहुल अग्रवाल, अॅड. अक्षय धोंगडे, सलोनी बोरा, दीपाली अंबेकर, ऋतुजा भंडारी, स्नेहल अंबेकर, तनिशा जैस्वाल, संतोष सारडा, गौरी अग्रवाल, रोहिणी राठोड, अभिज्ञा चव्हाण, जयप्रकाश बाहेती, अभिज्ञा चव्हाण, अमृता ढाकणे, शिवप्रसाद शिंदे आदींनी लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...