आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला:माय माझी गं पोळते.. उन्हातान्हात जळते; टेंभुर्णी येथील दिव्यांग कवी आकाश देशमुखचा साहित्य संमेलनात सहभाग

टेंभूर्णी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय माझी गं पोळते.उन्हामध्येही जळते..तिला पाहावत नाही.. तन-मन पिघळते ही कविता उदगीरच्या साहित्य संमेलनात सादर केली टेंभूर्णी येथील दिव्यांग कवी आकाश भास्कर देशमुख यांनी.

नुकतेच उदगीर येथे झालेल्या या संमेलनात कवी आकाश यांना निमंत्रितांचे कवी संमेलनासाठी निमंत्रण मिळाले होते. चालता- बोलता न येता ही आपल्या आईवडीलांना सोबत घेवून आकाश यांनी हे संमेलन गाठले. तेथे कविता सादर करण्यासाठी वडील भास्कर देशमुख यांनी कवी आकाश यांना काखेत उचलून मंचावर आणताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. बोलता येत नसल्याने त्यांची भावनिक कविता आई चे सादरीकरण रामचंद्र तिरूखे यांनी केले. यावेळी कवितेतील ओळी सादर होताच उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी जालना येथील कवयित्री संजीवनी तडेगावकर यांनीही आकाशला मंचावर आधार दिला.

दिव्यांग कवि आकाशचे मानव सेवा मंडळाचे नसीम शेख, दत्तू मुनेमाणिक, संजय राऊत, सुनील अंभोरे, संजय निकम, संतोष शिंदे, बालाजी मगर, साई बोरडे, गोविंद जाधव, कैलास देशमुख, खंडू देशमुख, अल्केश सोमानी, प्रदीप जयस्वाल, आदर्श शिक्षक शेख जमीर, प्रा. दत्ता देशमुख यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...