आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंरोजगार:नाबार्डचे स. महाव्यवस्थापक तेजल क्षीरसागर यांचे प्रतिपादन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण युवकांनी शेती आधारित स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक तेजल क्षीरसागर यांनी केले आहे. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे २३ ते २७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ग्रामीण युवकांसाठी आयोजित “अर्धबंदिस्त शेळीपालन” आणि “आळिंबी उत्पादन व प्रक्रिया” या विषयावर आयोजित चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांच्या संयुक्त समारोपात ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. एच. एम. आगे, गृह विज्ञान तज्ज्ञ संगीता कऱ्हाळे, प्रगतिशील शेतकरी कैलास शेजूळ यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात अर्धबंदिस्त शेळीपालन या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या २९ आणि आळिंबी उत्पादन व प्रक्रिया या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या २४ प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीकडे वळावे आणि त्यात शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम शेती, आळिंबी उत्पादन यासारख्या जोडधंद्याचा समावेश करावा असा सल्ला वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी दिला. चार दिवस चाललेल्या या दोन्ही प्रशिक्षणात अनेक मान्यवरांनी व तज्ञांनी व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना मार्गदर्शन केले.

शेळयांच्या विविध जाती, त्यांचे आहार व चारा व्यवस्थापन, लसीकरण, विक्री व्यवस्था, विविध शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर आळिंबीसंदर्भात विविध जाती, उत्पादनासाठी आवश्यक बाबी, आळिंबीचे आहारातील महत्त्व व त्यापासून बनवीता येणारे विविध पदार्थ, विक्री व्यवस्थेसाठी असलेला वाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकांची मानसिकता व उद्योजकिय गुण याबाबत प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संगीता कऱ्हाळे यांनी तर डॉ. एच. एम. आगे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...