आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खो-खो स्पर्धा:बदनापूर येथील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नानासाहेब पाटील विद्यालय ठरले विजेता

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील नजीकपांगरी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत १४ आणि १७ वर्षाखालील संघात नजीकपांगरी येथील नानासाहेब पाटील विद्यालयाने विजेतेपद पटकावले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना, पंचायत समिती बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मुले /मुली क्रीडा (खो-खो)स्पर्धेचे उद्घाटन आमदार नारायण कुचे, देविदास कुचे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सहदेव अंभोरे, संजय अंभोरे अर्जुन उढान, गजानन अंभोरे, दत्ता वाघ, नंदकिशोर वाघ, पी. एन. वाळके, संदीप पाटोळे, गणेश मदन यांची उपस्थिती होती. या दोन दिवसीय स्पर्धेत तालुक्यातून एकूण ४५ शाळांच्या संघाने सहभाग घेतला होता. सामने झाले यात तालुक्यातून एकूण ४५ शाळांचा संघानी सहभाग घेतला. १४ आणि १७ वर्षाखालील अंतिम सामन्यात कै.नानासाहेब पाटील विद्यालयाने विजेतेपद तर मैनामाई विद्यालय धोपटेश्वर या संघाने उपविजेतेपद पटकावले.

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, कैलास दातखिळ, तालुका क्रीडाधिकारी संतोष वाबळे, गटविकास अधिकारी ज्योती राठोड, गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, यशवंत जगदाळे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. पंच म्हणून बंडूभाऊ अंभोरे, गणेश जऱ्हाड, सिद्धार्थ वाघमारे, बप्पासाहेब ढोले, श्रीमंत वाघमारे, अमोल शिंदे, कृष्णा पवार, अभिराज अंभोरे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रल्हाद वाघ यांनी केले. सूत्रसंचालन विजय निकाळजे यांनी यांनी तर सचिन मोहिते यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...