आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस:जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नंदा पवार

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नंदा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जारी केलेल्या पत्रात सदरील नियुक्ती केली आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा दृष्टीकोन, उद्दिष्ट व अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली तसेच सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेशजी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करावे. बऱ्याच दिवसांपासून हे पद रिक्त होते. पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ. कैलास गोरंट्याल, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, सुरेशकुमार जेथलिया, राजेंद्र राख, संगीता गोरंट्याल आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...