आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नांदखेडा येथील रस्त्याची वाट लागली असून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना दररोज चिखल तुडवत मार्ग काढावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या परिसरातील किन्ही गावातील विद्यार्थ्यांसह सावित्रीच्या लेकींना चिखल तुडवत वाट शोधावी लागत आहे. दोन ते अडीच किलोमीटरचे अंतर पार करीत शाळा गाठावी लागते. ग्रामस्थांनाही जाफराबाद, देऊळगावराजा, जालनासह बाहेर गावी ये-जा करण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बससेवा बंद करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी जाफराबाद आगाराची बससेवा नियमितपणे सुरू होती. परंतु जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे रस्त्याची वाट लागली आहे. याबाबत सार्वजिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने दिली. परंतु कुणीच दखल घेतली नसल्याचे मनसेचे तालुका सरचिटणीस पंढरीनाथ म्हस्के यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.