आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नेशन फर्स्ट, मिशन लास्ट, बट मायसेल्फ नेव्हर ही त्रिसूत्री हवी

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेशन फर्स्ट,मिशन लास्ट बट माय सेल्फ नेव्हर या त्रिसूत्रीवर समाजाने यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन लक्ष्मीकांत महाराज देशमुख यांनी केले.अंबड शहरातील सकल ब्राह्मण समाजातर्फे खंडोबा मंदीरात गुरुवारी आयोजित विजयादशमी स्नेहमिलन कार्यक्रमप्रसंगी बौध्दीक सत्रात ते बोलत होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथराव कुलकर्णी, डॉ. यशवंत कुलकर्णी, ॲड. आर. आर. कुलकर्णी, दत्तोपंत देशपांडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. ब्राह्मण समाज ऐक्य देश हितकारक असून समाजाने या त्रिसुत्रीसह व युवकांनी बुद्धी व मेहणतीच्या जोरावर या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे.

आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी बुद्धी चातुर्याला मेहनतीची जोड देताना क्लास इज टेंपररी बट मेरीट इज परमनंट हा मूलमंत्र लक्षात ठेवून आपल्या गुणवत्तेला टिकवून ठेवावे. समाजातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहुन यातुन समाजहीत पर्यायाने देशहीत देखील साध्य करावे, लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमात अंबड शहरातील माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. यशवंत कुलकर्णी यांचा कंठ दाटुन आला. बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष बबनराव कुलकर्णी यांनी बाबुराव कुलकर्णी यांचे अंबड शहरासह राजकारणातील महत्व पटवुन दिले. श्रीपाद वाघरुळकर, केदार कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर शहरातील उदयोन्मुख गायकांनी भाव आणि भक्तीगीतांसह सुगम संगीताचा सदाबहार कार्यक्रम सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. यात महेश कुलकर्णी, संजय गंभीर, विदुला देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, नंदकिशोर वाघमारे यांचा समावेश होता. त्यांना ढोलकीवर प्रसन्न देशपांडे तर हार्मोनियम नंदकिशोर वाघमारे यांनी साथसंगत केली. सुत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले. विदुला देशमुख यांनी गजानना श्री गणराया, फुलले रे क्षण माझे, सांग ये गोकुळी, स्वयं श्री रामप्रभू ऐकती, महेश कुलकर्णी यांनी भेटला विठ्ठल माझा, या जन्मावर या जगण्यावर, महाराष्ट्र माझा, संजय गंभीर यांनी कानडा राजा पंढरीचा, दत्त दर्शनाला जायाचं, लख पडला प्रकाश दिवटया, उध्दवा अजब तुझे सरकार, लक्ष्मीकांत देशमुख यांनी सुख के सब साथी, कल्याणकरी रामराया, नंदकिशोर वाघमारे यांनी अबीर गुलाल उधळीत रंग तसेच विदुला देशमुख व महेश कुलकर्णी यांनी राजा ललकारी, निसर्ग राजा हे युगल गीत सादर केले. सुत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी सकल ब्राम्हण समाजातील युवकांनी परिश्रम केले.

बातम्या आणखी आहेत...