आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेजर ध्यानचंद जयंती:राजर्षी शाहू इंग्लिश शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौधरीनगर येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती तथा राष्ट्रीय क्रीडा दिन २९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई मांटे, मिताली मांटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव प्रो. डॉ. सुखदेव मांटे, लतिका मनोज, वरूण अंबेकर, एलीया गायकवाड यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शाळेत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश मिळविणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याची माहिती शाळेतील शिक्षक अभिजित भंडारे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळी अपर्णा भंडारे, मोहिनी श्रीवास्तव, रवींद्र गिरे, महेंद्रसिंग परदेशी, अयोध्या पितळे, रेणुका पळसकर, अलकनंदा घुले, रेखा शेळके, वर्षा जयरंगे, वसंत चित्राल, गिरीराज कुलकर्णी, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, मंगला नागरे, गणेश कायंदे, नारायण मोरे, राजू काकड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...