आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याच्या विरोधात जाफराबादेत राष्ट्रवादी रस्त्यावर

जाफराबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलेले आहे. यावरुन राज्यभरात सत्तार यांच्या विरोधात निदर्शने होत असून, जाफराबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी सत्तारांच्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले.

७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याने केवळ सुप्रिया सुळे यांचाच नाही, तर संपूर्ण महिलांचा अपमान केलेला आहे. सत्तार यांनी तत्काळ संबंध महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी अन्यथा सत्तारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा असे मुख्यमंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वक्तव्यामुळे सर्वच महिलांच्या भावना दुखावल्या असून, सत्तारांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी केली. यावेळी महिला तालुकाध्यक्ष विद्या देशमुख, शहराध्यक्ष साबेद चाऊस, राजू करवंदे, शेख मुजीब, फहीमखा पठाण, शेख तालेब, जखी खान, प्रभाकर अवकाळे, रघुनाथ पंडित, संतुकराव उबाळे, गणेशबापू चव्हाण, विनोद खेडेकर, उत्तम उगले, रामदास जाधव, मुन्ना सिद्दीकी, गुड्डू मघाडे, ज्ञानेश्वर बोराडे, कुसुम राऊत, कल्पना भिसे, एल.बी.शिंदे, शेख शफी, गजानन लोखंडे, संतोष अंभोरे, नितीन शिवणकर, अमोल शेळके, अँड. विनोद डिघे, विजय गोफने, प्रभाकर चव्हाण, प्रकाश राऊत, सुरेश मुरकुटे,गंजीधर चव्हाण, गजानन गाडेकर, प्रकाश परिहार, राजू जाधव, रमेश राठोड, शुभम घोडसे, विठ्ठल गोरे, दिलीप लोखंडे, कैलास खरात, शेख आसिफ, शंकर गायके, अंकुश वरगने, शेख आवेज, उमेश जाधव, शंकर शेळके, पांडू भुतेकर, सुनील मोरे, भागाजी गाडेकर, विजय दाभाडे, अँड. सचिन सोरमारे, सारेख सिद्दीकी, कडूबा राऊत, कैलास लोखंडे, सावता गोरे, विजय धुपे, प्रवीण चिडे, समाधान गाढवे, शेख सईद, राजू गवई, राजेंद्र रदाळ, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयातील महसूल सहायक कृष्णा फुलमाळी यांनी निवेदन स्विकारले.

बातम्या आणखी आहेत...