आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:नवकार आराधिका प्रतिभा श्रमण-श्रमणी निलयम जप; शनिवारी साध्वी धाम, आरोग्य धाम इमारतीचे होणार उद्घाटन

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर येथील गोकुळवाडीत नवकार आराधिका पू. प्रतिभाजी श्रमण-श्रमणी निलयमच्या जपानुष्ठानास प्रतिसाद मिळत आहे. दररोज सकाळी ९ ते संध्या ६ वाजेपर्यंत ५१ जोडप्यांद्वारे जप होत आहे. या अनुष्ठानला महाराष्ट्र सिंहनी, नवकार आराधिका, कोटा संघ प्रमुखा प्रतिभाजी मसाब, वर्धमान आयमबील तापोनिधी, प्रफुलाजी मसाब पु अमिताजी मसाब, दर्शनाजी मसाब यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

११ जून रोजी साध्वी धाम, आरोग्य धाम श्री वर्धमान गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण झाले असून या इमारतीचे उद्घाटन होत आहे. या इमारतीत आरोग्यधाम, सम्यकचरित्रकुंड, साधना केंद्र, सुधर्मा सभागृह तसेच गौतम प्रसादालयचा समावेश आहे. वृद्ध साधू-साध्वी यांना केंद्रबिंदू ठेऊन ही इमारत उभारली आहे. उद्या शुक्रवारी भक्तिसंध्या कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी उद्घाटनप्रसंगी प्रकाशचंद धारिवाल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे, राजेंद्र रेड्डी, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आनंदमल छलानी, ओमप्रकाश पोकर्णा, सुभाष झाम्बड, सुरेश जेथलिया, प्रकाशचंद धारिवाल आदींच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती दिनेश राका यांनी दिली. दरम्यान, या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी समाजबांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...