आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:नवाब मलिक यांची कोठडी पुन्हा वाढली, जामीन नाहीच

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत २० मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने जाहीर केला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. जामिनासाठी वारंवार प्रयत्न करुनही त्यांचा अर्ज न्यायालयाने स्वीकारलेला नाही.

सध्या त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे वकिलांनी न्यायालयाने सांगितले. दरम्यान, नवाब मलिक यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर निदर्शने करुन त्यांना जामिन देण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...