आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना प्रबलीकरण यात्रा:राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोपाल बछिरे यांनी बांधले शिवबंधन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. गोपाल बछिरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. औरंगाबाद ते मातोश्री (मुंबई) अशी शिवसेना प्रबलीकरण यात्रा काढत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते सोबत घेऊन व माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप, खासदार रवींद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बछिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवबंधन बांधले.

या वेळी प्रसेनजित बछिरे, रुद्र निंबाळकर, संतोष बारसे, गणेश पाठे, गजानन जोहरे, मोहन पठ्ठे, जय मांडवे, भारत बरथुने, देविदास फुलमाळी, लाला पुसे, रघुनाथ पद्ममे, बालाजी सोयगावकर, राजू सोनवणे, विकी फुलमाळी, शिवा तरटे, रवी भगुरे, भागीरथ धामणे, संजय चिकसे, प्रभू कटारे, पांडुरंग पवार, संतोष जाटवे, धनराज पसरटे, किसन फुलमाळी, मदन भगुरे, ईश्वर रेड्डी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...