आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने तपासणी:प्रमाणित तज्ज्ञांकडून सोने तपासणी करून घेण्याची गरज :  ॲड. बनवसकर

जालना5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोने तारण कर्ज देतांना बँकांनी केंद्र शासनाच्या प्रमाणित प्रशिक्षकांकडून (गोल्ड व्हल्युअर) तपासणी अंती खाञी करूनच कर्ज द्यावे, तसेच ग्राहकांनीही सोडवतांना फसवणूक टाळण्यासाठी पुर्नतपासणी करावी. अशी माहिती कायदेशीर सल्लागार ॲड. रोहित बनवसकर यांनी दिली. सोने तारण कर्ज प्रकरणात बनावट सोने प्रकार उघडकीस आला.

या पार्श्वभूमीवर गुरूवारी ॲड. बनवसकर यांनी सांगितले की, सोन्याचे दरमहा लेखापरीक्षण प्रमाणित परीक्षकांकडून केल्यास बँक आणि ग्राहकांमध्ये विश्वास दृढ राहिल. सोने तारण कर्ज प्रकरणांसाठी बँकांनी कर्मचाऱ्यांना सोने तपासणीचे प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे, बँका केवळ सोने विक्रेत्यांकडून तपासणी करत असल्याने फसवणुकीचे प्रकार वारंवार उघडकीस येत असून तारण सोने सोडवतांना सुध्दा ग्राहकांनी व्हलुअर कडून फेर तपासणी करून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...