आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्ष पद:मारवाडी महिला संमेलनच्या जालना शाखेच्या अध्यक्षपदी नीता खंडेलवाल

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारवाडी महिला संमेलनच्या जालना शाखेच्या अध्यक्षपदी निता खंडेलवाल, सचिवपदी विनिता तवरावाला तर कोषाध्यक्षपदी नीता बगडिया यांची निवड करण्यात आली असून, नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच हॉटेल मधुबनच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाच्या मार्गदर्शिका स्मिता चेचानी यांची उपस्थिती होती. मावळत्या अध्यक्षा तारा शर्मा, सचिव स्नेहा जोशी, कोषाध्यक्ष इंदू निमोदिया यांच्याकडून नूतन पदाधिकारी अनुक्रमे नीता खंडेलवाल, विनिता तवरावाला, नीता बगडिया यांनी पदभार स्वीकारला.

उर्वरित कार्यकारिणीमध्ये सावित्री मल्लावत, सुषमा अग्रवाल, शोभा धारिवाल, ज्योती अग्रवाल, अर्चना चेचानी, उमा पित्ती, मधुलता भक्कड, प्रफुल्लता राठी, शोभा देविदान, कमला मेहता, कविता पीत्ती, अनुराधा जैन यांचा समावेश आहे. यावेळी स्मिता चेचानी यांनी मार्गदर्शन करून नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मावळत्या अध्यक्षा तारा शर्मा यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नूतन अध्यक्षा नीता खंडेलवाल म्हणाल्या की, सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यावर विशेष भर दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...